Posts

Showing posts from June, 2020

ढोली: मारी लुईज काश्नित्झ

जानेवारी महिना नुकताच संपत आला होता. नाताळची सुट्टी संपल्यानंतर ती जाड मुलगी माझ्याकडे आली. त्याच हिवाळ्यात मी लहान मुलांसाठी एक वाचनालय सुरु केले होते. दर आठवड्याच्या ठरलेल्या दिवशी मुले येऊन त्यांच्या आवडीची पुस्तके घेऊन जायची आणि पुढच्या आठवड्यात परत आणून द्यायची. येणारी बरीचशी मुले माझ्या ओळखीची होती , पण काही जण मात्र लांबून यायचे. बरीचशी मुले पुस्तके देवाणघेवाणी पुरती थांबत असत , तर काही मात्र पुस्तक हातात पडले की तिथेच वाचायला सुरवात करत. मी कोपर्यात बसून माझे माझे काम करत राहायचे आणि मुले तिथेच माझ्या अवतीभवती छोट्या टेबल खुर्चीपाशी बसून वाचन सुरु करत. त्यांचा तो सहवास मला आवडत असे. एखाद्या शुक्रवारी किंवा शनिवारी ती जाड मुलगी माझ्याकडे आली असणार. नक्की नाही आठवत , पण आठवड्याचा ठरलेला वार तो नक्की नव्हता. मला बाहेर जायचे होते आणि जाण्याआधी काही खाऊन घ्यावे , म्हणून मी माझे ताट घेऊन टेबलापाशी बसले होते. ती येण्याच्या काही काळ आधी माझ्याकडे पाहुणे येऊन गेले होते आणि जाताना बहुदा ते दार उघडे ठेऊन गेले असणार. कारण , ताट टेबल वर ठेऊन मी काही आणायला म्हणून वळले, तर मला ती समोर...